AmravatiEducation NewsLatest News
मानवतावादी संत रविदास महाराज यांना जयंतीदिनी विद्यापीठाच्यावतीने अभिवादन

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात मानवतावादी संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, न.न.सा. मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, उपकुलसचिव (आस्थापना) श्री मंगेश वरखेडे, सहा. कुलसचिव श्री अनिल मेश्राम, उपअभियंता (विद्युत) श्री राजेश एडले तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. संचालन व संत रविदास महाराज यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.