वहिनीला एकटं पाहून दीराचा संयम सुटला, बलात्कार केला अन्..

राजस्थान :- राजस्थानमध्ये नात्याल्या काळिमा फासणारी घटना घडली आहे. दीराने वहिनीवर बलात्कार करत पवित्र नात्याला कलंक लावलाय. वहिनीला घरात एकटेच पाहून दीराच्या अंगातील सैतान जागा झाला. त्यानं घरत घुसून जबरदस्तीने बलात्कार केला. वहिनीने दीराच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. राजस्थानमधील धौलपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
वहिनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दीराच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पीडित वहिनीची मेडिकल टेस्ट करण्यात आली, त्यानंतर पोलिसांच्या तपासाला सुरूवात झाली. पोलिसांनी याप्रकरणी वेगात तपास सुरू केला असून पीडित महिलेच्या कुटुंबियांचाही जबाब घेतला जात आहे.
भावाच्या विरोधात गुन्हा –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या वेळी पीडित महिला तिच्या रूममध्ये एकटीच होती. तिला एकटं पाहून दीर रूमध्ये गेला. त्यानंतर दीराने वहिनीवर जबरदस्तीने बलात्कार केला. दीराच्या या कृत्यानंतर महिलेने आरडाओरड सुरूवात केली. त्यावेळी शेजारी घरात आले, त्यांना पाहून आरोपीने पळ काढला. नवरा घरी आल्यानंतर पीडित महिलेने आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगिती. नवऱ्याने बायकोसोबत पोलीस स्टेशन गाठत भावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिलेची मेडिकल टेस्ट करणयात आली. आरोपी दीर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दीराने केलेल्या कृत्यमुळे राजस्थानमधील धौलपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांमध्ये दीराच्या विरोधात संतापाची लाट आहे. दीर पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीला लवकरच अटक करू असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलेय.