“संत रविदास महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचा सन्मान”
अमरावती :- राष्ट्रीय चर्मकार महासंघ अमरावती शहर शाखेच्या वतीने आयोजित संत रविदास महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित निबंध स्पर्धेत सहभागी व विजयी स्पर्धकांना नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान सन्मानित करण्यात आले. निबंध स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह तसेच सहभागी 40 स्पर्धकांना प्रमाणपत्र यावेळी वाटप करण्यात आले. स्थानिक महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 14 वडाळी येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान श्री संत रविदास महाराज यांची जयंती प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त मुख्याधिकारी श्री सुधाकररावजी पानझाडे, शहर अध्यक्ष श्री योगेश पखाले, जगदेवराव रेवसकर ,शिक्षक आघाडी अध्यक्ष गजानन वानरे, रमेश भटकर, मुख्याध्यापिका कु. नीलिमा लव्हाळे , श्री.रमेश भटकर ,प्रीती खोडे, कमला इंगळे, विद्याताई सोनटक्के यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम बक्षीस – अक्षरा इंगळे,द्वितीय पारितोषिक – कु. गौरी हीमाने तर तृतीय पारितोषिक – संविधान अवचार यांनी पटकाविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चर्मकार महासंघाचे शहराध्यक्ष योगेश पखाले यांनी केले. संत रविदास महाराज यांचे जीवन चरित्र व त्यांनी आयुष्यात केलेल्या कामगिरीबद्दल समाजातील सर्वांना याबाबत माहिती व्हावी या उद्देशाने अशा प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी साजरे करणे आवश्यक असल्याचे मत श्री सुधाकर पानझाडे यांनी यावेळी व्यक्त केले.
उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कु.कल्पना मॅडम, ज्योती अस्वार, प्राजक्ता मॅडम, राजश्री सोळंके , राजकुमार जाधव यांनी परिश्रम घेतले.