सुधीर मुनगंटीवार यांच्या रेस्ट पिरेडबाबत अशोक चव्हाण यांचे वक्तव्य

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना सपत्नीक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदावरून हलकेफुलके पण अर्थपूर्ण भाष्य केले. काय म्हणाले अशोक चव्हाण? पाहुयात प्रतिनिधि मनोज मनपूर्वे यांचा हा रिपोर्ट.
माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते काहीसे शांत होते. मात्र, या विश्रांतीला एक टप्पा मानत अशोक चव्हाण यांनी मिस्कील टिप्पणी केली.
ते म्हणाले…
“आयपीएलमध्ये पुढील बॅटिंगसाठी खेळाडूंना थोडा रेस्ट द्यावा लागतो. विराट कोहलीही चांगला खेळल्यानंतर ब्रेक घेतो. तो ब्रेक हा पुन्हा जोरदार खेळण्यासाठी असतो. मला खात्री आहे सुधीर भाऊंचा हा रेस्ट पिरेडही लवकर संपेल आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार बॅटिंग करतील.”
म्हणजेच, मंत्रिपद नसले तरी सुधीर मुनगंटीवार यांचे पुनरागमन निश्चित असल्याचा संकेत अशोक चव्हाण यांनी दिला.
सुधीर मुनगंटीवार यांचा रेस्ट पिरेड लवकर संपेल आणि ते पुन्हा राजकारणात सक्रिय होतील, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. आता हे अंदाज कितपत खरे ठरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल