अचलपूर बाजार समितीत तुरीची आवक वाढली, शेतकऱ्यांच्या मागण्या तीव्र

अचलपूर :- अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून येत आहे, जिथे तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. मात्र, सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनला किमान ₹6000 आणि कापसाला ₹10,000 भाव मिळावा अशी मागणी केली आहे. बाजार समितीचे डायरेक्टर सतीश व्यास यांनीही शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य भाव मिळावा आणि त्वरित रोकड पेमेंट होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेऊया.
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मोठ्या प्रमाणात तुरीची आवक होत आहे. मात्र, सोयाबीनला कमी दर आणि कापसाला अपेक्षित हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. बाजारात सोयाबीनला जेमतेम ₹4000-₹4500 प्रति क्विंटलचा दर मिळत असून, शेतकऱ्यांनी किमान ₹6000 दर मिळावा अशी मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे, कापसासाठीही ₹10,000 प्रति क्विंटल दर मिळावा अशी जोरदार मागणी होत आहे. शासन शेतकऱ्यांना हमीभाव देत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बाजार समितीचे डायरेक्टर सतीश बाबू व्यास यांनी केंद्र सरकारची शेतकऱ्यांबाबतची नीती बदलण्याची गरज असल्याचे सांगत, कृषी मालाला योग्य दर मिळावा आणि शेतकऱ्यांचे पेमेंट त्वरित रोखीने व्हावे, अशी मागणी केली आहे.
तर अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने तातडीने योग्य हमीभाव जाहीर करावा अशी मागणी होत आहे. बघायचं आता की सरकार यावर काय निर्णय घेते. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा city News