Accident NewsLatest NewsVidarbh Samachar
अजितदादांना मोठा धक्का, माजी आमदाराचे अपघाती निधन, राजकीय वर्तुळात शोक

अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिडकर यांचं निधन झाल्याची माहिती आहे. अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ते गुरुवारी (१३ फेब्रुवारी) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतत होते. तेव्हा शिवर येथे त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
एका पिकअप गाडीने तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीला धडक दिल्याने तुकाराम बिडकर आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र राजदत्त मानकर या दोघांना मोठी दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मित्राबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही.