Latest NewsVidarbh Samachar
आवक वाढल्याने बाजारात तुरीचे भाव घसरले

यवतमाळ :- गेल्या काही वर्षांत तूर, सोयाबीन, कापूस यांसारख्या प्रमुख पिकांचे दर घसरत असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सध्याच्या हंगामात तुरीच्या दरांमध्ये झालेली घसरण शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मागील वर्षभर चांगल्या भावांचा अनुभव घेतलेल्या शेतकऱ्यांना यंदा तुरीचे दर अचानक घसरल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. सध्या बाजारात नवीन तुरीला सरासरी ₹6700 ते ₹7300 दर मिळत आहे. मागील वर्षी हाच दर ₹10,000 ते ₹11,000 पर्यंत होता. त्यामुळे यंदा दरात तब्बल 4 हजार रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. नाफेड मार्फत खरेदी कधी सुरू होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.