नागपूर रेल्वे पोलिसांचा मोठा यश: तेलंगाना एक्सप्रेसमध्ये घरफोडी करणारे तीन आरोपी अटकेत

नागपूर :- एक नजर नागपूरच्या क्राइम जगतावर, नागपूर शहरात रेल्वे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. मध्य रेल्वे पोलिसांच्या क्राइम इंटेलिजन्स टीमने हैदराबाद वरुण मोठी घरफोडी करून पळालेल्या आणि तेलंगाना एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई नागपूर रेल्वे स्टेशनवर करण्यात आली, पोलिसांनी आरोपीकडून कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपूरच्या मध्य रेल्वे पोलिसच्या क्राइम इंटेलिजन्स टीमला हैदराबाद पोलिसांचा एक महत्त्वाचा कॉल आला. त्यात सांगण्यात आले की, तेलंगाना एक्सप्रेसमध्ये काही बदमाश एक मोठी घरफोडी करून फरार झाले आहेत. यावरून पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आणि दोन अधिकारी संबंधित ट्रेनमध्ये चढले. त्यांच्या तपासाच्या दरम्यान, पोलिसांना ट्रेनमध्ये चोरी करणारा एक आरोपी सापडला.
पण, तपास सुरू असतानाच, पोलिसांना कळालं की या आरोपीसह दोन इतर आरोपी चोरी करत आहेत. यामध्ये एका महिलेचा समावेश असल्याचे उघड झाले. या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींनी दिल्लीमध्ये पळून जाण्याची तयारी केली होती. पोलिसांनी आरोपींच्या पासून चार बॅग मुद्देमाल जप्त केला, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, कॉइंस असा एक कोटी 35 लाख रुपये तसेच, 9.6 लाख रुपयांची भारतीय करन्सी आणि 24 वेगवेगळ्या देशांची करन्सीही जप्त करण्यात आली. या सर्व मुद्देमालाची किंमत कोटीच्या घरात आहे. आरोपींना पोलिसांनी नागपूरमध्ये आणले आहे आणि पूढील तपास सुरू आहे. या घटनेची अधिक माहिती मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज कुमार यांनी दिली आहे.
हे ऑपरेशन मध्य रेल्वे पोलिसांसाठी एक मोठं यश ठरलं आहे. पोलिसांच्या चोख कारवाईमुळे आरोपींना लवकरच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आम्ही आपल्याला या घटनेबद्दल अधिक अपडेट्स देत राहू. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी बघत रहा सिटी न्यूज.