पुसद शहरात आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव, पोलिसांनी घेतली तत्काळ कारवाई

यवतमाळ :- “छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आल्यानंतर पुसद शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती घेऊया आमच्या खास रिपोर्टमध्ये.”
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर जनतेत तीव्र संताप उसळला. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्या विरोधात राज खंदारे या इंस्टाग्राम अकाउंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली होती. या घटनेमुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला.
यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले असतानाच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला अटक केली. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, सदर युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुसद शहरातील सदर प्रकारानंतर पोलिसांनी त्वरीत पावले उचलल्यामुळे मोठा अनुचित प्रकार टळला आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, सोशल मीडियावर अशा आक्षेपार्ह पोस्ट पसरवू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील अपडेट्ससाठी जोडले राहा.