“रेल्वे स्टेशन रोड, चांदणी चौक परिसरात प्लास्टिक निर्मूलन व डस्टबिन बाबत कारवाई, १०,०००/- रुपये दंड वसूल”

अमरावती :- वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, सहायक आयुक्त धनंजय शिंदे दक्षिण झोन क्र.४, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक शारदा गुल्हाणे दक्षिण झोन क्र.४ यांच्याद्वारे प्राप्त निर्देशानुसार आज दिनांक १३/०२/२०२५ रोजी रेल्वे स्टेशन रोड, चांदणी चौक परिसरात प्लास्टिक निर्मूलन व डस्टबिन बाबत कारवाई करण्यात आली. सदर ठिकाणी आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून तपासणी दरम्यान आस्थापनाकडे प्लास्टिक ग्लास आढळून आल्याने आस्थापना माऊली डेली नीड्स यांना ५०००/- रुपये, महादेव डेली नीड्स यांना ५०००/- रुपये दंड असे एकुण १०,०००/- रुपये इतका दंड वसुल करण्यात आला. सदर मोहीममध्ये नोडल अधिकारी विकी जेधे, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक शारदा गुल्हाने, स्वास्थ निरीक्षक मेघराज ढेडवाल, सुमेध मेश्राम, वैभव खरड, सागर राजूरकर, सोपान माहुलकर, प्रियंका बैस,रोहित हडाले, अनिल गोहर उपस्थित होते.