विद्यापीठात भारतीय ज्ञान प्रणालीवरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोग -मालविया मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने पी.एम. पुष्पा योजनेंतर्गत ‘भारतीय ज्ञान प्रणाली : शिक्षणाकडे एक समग्र दृष्टिकोन’ या विषयावर नुकतीच राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी तथा कार्यशाळेच्या उद्घाटक म्हणून मानवविज्ञान शाखेच्या अधिष्ठाता व मराठी विभाग प्रमुख डॉ. मोना चिमोटे, नागपूर येथील जे.एस.डी.आय.व्ही.एस.आर.-आय.के.एस. चे संचालक आचार्य श्रेयस कु-हेकर, व्य.प. सदस्य तथा कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. मनिषा कोडापे, डॉ. प्रशांत गावंडे उपस्थित होते.
प्रमुख अतिथी तथा उद्घाटक डॉ. मोना चिमोटे म्हणाल्या, आधुनिक अध्यापनशास्त्रासोबतच प्राचीन ज्ञानाचा समावेश केल्याने जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि सांस्कृतिकदृष्ट¬ा समृध्द अशी शिक्षण व्यवस्था निर्माण होऊ शकेल. आचार्य श्रेयस कु-हेकर म्हणाले, भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये समृध्द वारसा आणि वैज्ञानिक सखोलतेसह शिक्षण, आरोग्य सेवा, शा·ातता, नवकल्पनांना आकार देण्याची क्षमता आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, भारतीय ज्ञान प्रणालीचा शिक्षणामध्ये समावेश होणे अधिक महत्वाचे आहे. विद्याथ्र्यांनी सादर केलेल्या मॉडेल्सच्या माध्यमातून भारतीय शिक्षण पध्दतीचा प्रवास अतिशय सुंदररित्या उलगडून दाखविला आहे आणि आपला समृध्द वारसा आधुनिक अध्यापन जोडण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
एम.एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्याथ्र्यांचे मॉडेल सादरीकरण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. रसायनशास्त्राचे विद्यार्थी हकीम नौशाद, अभिषेक सोमकुंवर, नफिसा चव्हाण, पुजा सरोदे, श्रावणी चौधरी, प्रांजली चव्हाण, श्रेया चव्हाण, कोमल सावके, नितेश भटकर, वैष्णवी शुक्ला, प्राची बोरघाटे, शिवशंकर अंभोरे, प्रिया वानखडे, मयुरी काकडे, सुमित लोणे या विद्याथ्र्यानी प्राचीन गुरुकुल शिक्षण प्रणालीपासून तर आधुनिक शिक्षण पध्दतीपर्यंतच्या भारतातील शिक्षणाच्या कालखंडाचे वर्णन करणारे मॉडेल्सचे सादरीकरण केले. प्रास्ताविक डॉ. मनिषा कोडापे, स्वागत व पाहुण्यांचा परिचय डॉ. गावंडे यांनी, सूत्रसंचालन कु. श्रावणी बावनेर, तर आभार डॉ. स्वाती गडखे यांनी मानले. कार्यक्रमाला अधिसभा सदस्य डॉ. जागृती बारब्दे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वर्षा नाठार, डॉ. कुरवाडे, डॉ. माणिक, डॉ. मोरे, अनघा घुरडे, निकिता निमगडे, रिसर्च स्कॉलर, शिक्षक, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.