अकोला येथे मनसे कार्यकर्त्यांची दादागिरी, एसटी बसवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला

अकोला :- अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात मनसे कार्यकर्त्यांची दादागिरी पाहायला मिळाली. एका अज्ञात व्यक्तीने मनसेचा बॅनर फाडल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी एसटी बसवर हल्ला केला. बसच्या खिडक्या फोडण्यात आल्या आणि मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. या घटनेचे व्हिडिओही समोर आले असून, त्यात महिलांसह अनेक कार्यकर्ते बसवर हल्ला करताना दिसत आहेत. पाहुया खास रिपोर्ट
ही घटना पिंपळखुटा येथून अकोलाकडे जाणाऱ्या एसटी बससोबत घडली. बस तुलंगा खुर्द गावाजवळ पोहोचताच अचानक मनसे कार्यकर्त्यांनी बसवर लाठ्यांनी हल्ला केला. त्यांनी बसच्या खिडक्या फोडून आतील सामानाची नासधूस केली.
घटनेनंतर बसचालक दिगंबर राऊत यांनी चान्नी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मनसे कार्यकर्ते राजेश बोरकर, सोपान बुदे, विकास शेवलेकर, निर्मला शेवलेकर, गोविंदा शेवलेकर आणि आरती शेवलेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
पोलिस प्रशासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. हा हल्ला नियोजनबद्ध कट होता का केवळ संतापाचा परिणाम, याचा तपास सुरू आहे.
ही घटना एसटी बस प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करते. राजकीय वादाच्या नावाखाली सार्वजनिक संपत्तीची नासधूस करणे योग्य आहे का? यावर तुमचे मत काय? आम्हाला कमेंट करून कळवा.