गो. से. महाविद्यालयाच्याविद्यार्थ्यांची विकमशी फॅब्रिक्स प्रा. लिमिटेड खामगावला शैक्षणिक भेट.

स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगांव व्दारा संचालित गो. से. विज्ञान कला व वाणिज्य़ महाविद्यालय, खामगांव येथे वाणिज्य व व्यस्थापनशास्त्र विभागाद्वारे दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी वाणिज्य विभागाच्या पदवी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची विकमशी फॅब्रिक्स प्रा. लिमिटेडला शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना व्यावसायिक व उद्योगांच्या कामकाजाबद्दल व्यावहारिक अंतदृष्टी प्रदान करणे आणि उत्पादन आणि इतर औद्योगिक कार्यामध्ये समाविष्ट असलेल्या विविध प्रक्रियाबद्दल माहिती करून देणे हा होता.
या भेटी दरम्यान श्री. रमेश ताठे यांनी विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये होणाऱ्या विविध कार्यप्रणालीबद्दल सविस्तर माहिती दिली .उद्योगाच्या कार्यप्रणाली मध्ये गुंतलेल्या विविध प्रक्रियांबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. सदर सहलीकरिता ५० विद्यार्थी व १० प्राध्यापक सहभागी झाले होते. या शैक्षणिक सहलीच्या यशस्वितेकरिता विभागप्रमुख डॉ. डी. एन. व्यास, डॉ. एम. एस. गायकवाड, डॉ. जे. डी. पोरे, प्रा. राज फाटे, प्रा. आटोळे, प्रा. ताठे, प्रा. रोशनी शेलकर, प्रा. वैष्णवी साहू, प्रा. शुभांगी नांदोकार, प्रा. रुचिका कारंजकर यांनी अथक परिश्रम केले. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.
माननीय संपादक / जिल्हा प्रतिनिधी वरील बातमी फोटोसह आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द़ करुन उपकृत करावे ही विनंती.