नागपूरमध्ये घरफोडी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, 13 लाख 20 हजार रुपये जप्त

नागपूर क्राइम :- एक नजर नागपूरच्या क्राइम जगतावर, नागपूर शहरातील पोलिसांनी केलेल्या महत्त्वाच्या घरफोडी गुन्ह्याच्या तपासा बद्दल माहिती जाणून घेऊया,
नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत जरीफटका पोलीस स्टेशन हद्दीत 26 जानेवारी रोजी एक तक्रार प्राप्त झाली, ज्यात घरफोडी मध्ये 13 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती मिळाली. या प्रकाराच्या चोरींच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून पोलिसांना प्राप्त होऊ लागल्या होत्या. जरीफटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घरफोडी प्रकरणांच्या तपासात पोलिसांनी त्वरित कार्यवाही सुरू केली.
तक्रारींच्या आधारे पोलिसांनी सर्वच शक्य मार्गांचा शोध घेतला. त्यांनी जवळपास 180 छोटे छोटे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यातून तीन संशयित आरोपी आढळून आले. त्या आरोपींना अटक केली असता, ते तिघेही विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींना ताब्यात घेतल्यावर पोलिसांना त्यांच्याकडून आणखी पाच अन्य घरफोड्यांचा उलगडा झाला आणि 1 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, सोन्याचे दागिने रेकॉर्डवरील एक आरोपी आशिष उर्फ बोन्ड्यात चौधरी याला विकण्यासाठी दिले असल्याचे समोर आले. आशिष चौधरी, कलम 307 च्या गुन्ह्यांत वॉन्टेड आहे, त्याला पोलिसांना अटक करण्यात यश प्राप्त झाले.
नागपूर शहरातील या घरफोडीच्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे. पुढील तपासासाठी जरीफटका पोलीस अधिक माहिती प्राप्त करण्यास कार्यरत आहेत. अशाच अधिक माहिती साठी बघत रहा सिटी न्यूज