LIVE STREAM

Crime NewsLatest NewsNagpur

नागपूरमध्ये पोलिसांचा मोठा शोध ऑपरेशन, २ आरोपी व विधीसंघर्ष बालक ताब्यात घेतले

नागपूर :- एक नजर नागपूरच्या क्राइम जगतावर, गणेशपेठ हद्दीत पोलिस पेट्रोलींग करीत असतांना काही संशयीत हालचाली करतांना 3 युवक दिसून आले, पोलिसानी त्यांना ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ चाकू मिळून आला. या तीन आरोपीमध्ये एक विधीसंघर्ष बालक असून त्यांना न्यायालयात दिलेल्या तारखेवर हजर राहण्याचे सुचना पत्र देवून सोडण्यात आहे .

दि. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ००:३० ते ०१:३० वाजेच्या दरम्यान, बिट मार्शल क. ०१ हद्दीत सतर्क पेट्रोलिंग करत असताना आरोपी जय सतिश सूर्यवंशी (वय १८), रैशल रोशन मलकाम (वय १९) आणि एक विधीसंघर्ष बालक (वय १५) संशयित हालचाली करत असताना पोलिसांच्या नजरेस आले. त्यांना ताब्यात घेतल्यावर अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ चाकू आढळून आला. आरोपींनी त्यांच्याविरुद्ध चालू असलेल्या तपासात गोवा जाण्याची तयारी करणाऱ्या देवेश कुमार संजय सैनी (वय २२), जो अमरावती येथून नागपूर येथील गणेश पेठ बस स्थानकावर आलेला होता, याला लुटण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी फिर्यादिच्या गळ्यातील हेडफोन ओढून त्याला चाकूचा धाक दाखवून त्याची आंगठी मागितली.

घटना घडताच, बिट मार्शल क. १ पोलीस अधिकारी दिगांबर मुळे आणि होमगार्ड आकाश गिरी यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या आरोपींना चाकूसह ताब्यात घेतले आणि गणेशपेठ पोलिस ठाण्यात हजर केले. त्यानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान, आरोपींनी आपल्यावर आरोप असल्याचे स्वीकारले, आणि न्यायालयात हजर होण्यासाठी त्या दोन्ही आरोपींना व विधीसंघर्ष बालकाला सुचना पत्र देवून सोडण्यात आले. ही कारवाई पोलिस उप आयुक्त महक स्वामी आणि सपोआ अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, गणेशपेठ पोलिस ठाण्याचे व.पो.नि. एम.आर. पंडित, सपोनि जितेंद्र गाडगे, पोउपनि मल्हारी डोईफोडे, पोलिस अंमलदार तेजराम झंझाड, सुमेध नितनवरे, दलित लोखंडे, सागर धवन, दिगांबर मुळे आणि होमगार्ड आकाश गिरी यांच्या अथक प्रयत्नांनी पार पडली आहे.

आताच आपण नागपूर शहरातील पोलिसांच्या महत्त्वाच्या कारवाईचे अपडेट आपण बघितले. गुन्ह्याचा तपास सुरू असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. अधिक माहिती साठी बघत रहा सिटी न्यूज.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!