परतवाड्यात व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ-पितृ पूजन, संस्कार इंटरनॅशनल शाळेचा आगळावेगळा उपक्रम!

परतवाडा :- प्रेमाचा दिवस म्हणजेच 14 फेब्रुवारी, पण परतवाड्यात या दिवशी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले! संस्कार इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मातृ-पितृ पूजन करत आपल्या आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या अनोख्या उपक्रमाची खास झलक पाहूया आमच्या या विशेष अहवालात!”
परतवाडा येथील संस्कार इंटरनॅशनल शाळेत 14 फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ पूजनाच्या स्वरूपात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे पूजन केले आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून आशिर्वाद घेतला. भावनिक क्षणी पालकांचे डोळे पाणावले, तर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या प्रदक्षिणा घालून त्यांना मान-सन्मान दिला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. कमल अग्रवाल, संचालक मंडळ, तसेच प्रधानाचार्य प्रज्ञा आगवणे आणि शिक्षक वृंदांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.यावेळी उपस्थित पालकांनी आपल्या मुलांसाठी प्रेमभाव व्यक्त करत पुष्पमाला त्यांच्या गळ्यात टाकून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी मातृ-पितृ पूजनाची वार्षिक परंपरा पुढे चालवण्याचा संकल्प केला आहे.
व्हॅलेंटाईन डेचा प्रेमभाव जपण्याचा हा एक वेगळा आणि अनुकरणीय मार्ग ठरला आहे. आई-वडिलांचे आशीर्वादच खरे प्रेम आणि खरी ताकद आहे, हे संस्कार इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले. अशाच सकारात्मक उपक्रमांसाठी आमच्या टीमकडून शुभेच्छा! पुढील बातम्यांसाठी पाहत राहा. CITY NEWS