LIVE STREAM

AmravatiEducation NewsLatest NewsSports

पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ खो-खो (पुरुष) स्पर्धेकरीता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती :- विक्रांत युनिव्र्हसिटी ग्वालियर येथे 07 ते 11 मार्च, 2025 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ खो-खो (पुरुष) स्पर्धेकरीता विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला असून चमूचा प्रशिक्षण वर्ग श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथे दि. 23 फेब्राुवारी ते 04 मार्च, 2025 दरम्यान होणार आहे.

चमूमध्ये कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदराचा रोशन पिवाल, कौशिक गहलोत, पवन गुप्ता व आदित्य राऊत, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा यश सदांशिव, प्रतिक पाल, भूषण गेडाम व श्रृतिज अवसरे, बी.बी. शिवशक्ती महाविद्यालय, बाभुळगांवचा शुभम सुरोशे, स्व.एन.ए.डी. महाविद्यालय, चांदुरबाजारचा मयुर खंडारे, इंदिरा गांधी महाविद्यालय, राळेगांवचा करण आमटे, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीचा हरिश उके, कला व वाणिज्य महाविद्यालय, वरवट बकालचा आयुष बोरखडे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा लख्खुराम वड्डे, आर.जी. राठोड कला महाविद्यालय, मूर्तिजापूरचा हर्षल इंगळे, युवाशक्ती कला व विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा शरद पाटील, कला महाविद्यालय, बुलडाणाचा एजाज हिरीवाले व स्व. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालय, नांदगांव पेठचा चेतन उके यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!