बजाजनगर पोलिसांची मोठी कारवाई, फसवणुकीच्या आरोपींना गाजीयाबादमध्ये अटक

नागपूर :- एक नजर नागपूरच्या क्राइम जगतावर, नागपूरच्या बजाजनगर पोलिसांनी एका फसवणुकीच्या प्रकरणात दोन्ही आरोपींना गाजीयाबाद पोलिसांच्या मदतीने अटक केली. ही घटना १९ सप्टेंबर २०२४ ते २३ डिसेंबर २०२४ या कालावधीत घडली. फिर्यादी विजय कृष्णराव सोनटक्के यांच्याकडून लाखो रुपये फसवणूक करून घेतल्याचा आरोप असलेले आरोपी हरीहर मिश्रा आणि मदीरा माथुर यांनी, विविध इन्शुरन्स पॉलिसींच्या संबंधात फिर्यादीला खोटी माहिती देऊन मोठी रक्कम लुबाडली. या प्रकरणी बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, या आरोपीना अटक करण्यात पोलिसाना यश आले. या संदर्भात बजाज नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र अहिरकर यांनी दिली.
बजाजनगर पोलीसांच्या योग्य तपासणीमुळे आरोपींना अटक करून पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. या प्रकरणात आणखी तपास सुरू आहे आणि संबंधित आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे.पोलिसांच्या या कार्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालता येईल. याचसोबत, आपल्याला अशा कोणत्याही फसवणुकीसाठी सतर्क राहण्याची गरज आहे.याचसह आणखी अपडेटसाठी आणि पुढील बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज