LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

शरद पवारांवर नाराजी नाही, संजय राऊत पुरस्कारावरून कडाडले, ‘एकवेळ भारतरत्न, परवीरचक्र चाललं असतं’

संजय राऊत :- शरद पवार यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थिती लावल्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वेग आला आहे. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव हा पुरस्कार देण्यात आला होता. इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे युती असताना शरद पवारांची ही कृती ठाकरे गटाला प्रचंड झोंबल्याचं दिसलं. यावरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी या कार्यक्रमाला जायला नको होते, असे वक्तव्य केल्याने ते शरद पवारांवर नाराज असल्याची चर्चा होती. यावर मी नाराज नाही. आम्ही पक्षाची भूमिका मांडली. एकनाथ शिंदेंना शरद पवारांचा हस्ते पुरस्कार देणे हा पवारांचाच अपमान आहे. असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सरकारवर जोरदार टीका केली.

शरद पवारांवर नाराजी नाही: संजय राऊत

‘शरद पवारांविषयी नाराजी असण्याचा कारण काय? शरद पवारांवर अजिबात नाराजी नाही. आम्ही विशिष्ट घटनेपुरती आमची भूमिका मांडली. आमची नाराजी नाही. आम्ही भूमिका मांडली पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्र ज्याला गद्दार म्हणून संबोधतो, ज्याने अमित शहांची हातमिळवणी करून, बेईमानी करून सरकार पाडलं.. त्यांचा सत्कार पवार साहेबांच्या हातून करणे हा शरद पवारांचा अपमान आहे. महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार देणे जो शूर योद्धा दिल्ली पुढे कधी झुकला नाही. त्या महादजी शिंदेंचा हा अपमान आहे ही आमची भूमिका. मुळात हा खासगी संस्थेने दिलेला पुरस्कार आहे.’ असे संजय राऊत म्हणाले.

‘जे टीका करतात त्यांना माझे आणि पवार साहेबांच्या संबंध माहित नाहीत. शरद पवार आम्हाला पित्यासमान आहेत. ही भूमिका आमच्या पक्षाची आहे. शिंदे गटाच्या लोकांना तोंडाची जबडे वाजवताना पाहिला आम्ही. मी पवार साहेबांवर टीका केली नाही. मी पक्षाची भूमिका मांडली.’ असेही ते म्हणाले.

यांना आलेला पवारांचा पुळका खोटाय: संजय राऊत

‘आता यांना पवार साहेबांचा इतका पुळका आलाय हा किती खोटा आहे. अमित शहा महाराष्ट्रात येतात. शरद पवारांविषयी अद्वा तद्वा बोलतात. तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली? हा पवार साहेबांचा अपमान नाही का? नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतात. बरच काही म्हणून जातात? अमित सहानी किती खालच्या शब्दात टीका केली. तेव्हा हे सगळे बिळात का लपले होते? तेव्हा तुमचा आत्मा जागा झाला नाही? आम्ही पक्षाचीच भूमिका मांडली. जर शिंदेंनी पक्ष फोडला नसता तर शरद पवारांचा पक्ष ही फुटला नसता. अजित पवार बाहेर गेले नसते. असं संजय राऊत म्हणाले. उलट ही शरद पवारांची सुद्धा भूमिका असायला हवी. मी बोललो माझ्या हिम्मत आहे. ही सगळी भंपक लोक आहेत. महाराष्ट्रात डर्टी पॉलिटिक्स करत आहेत. ‘असा घणाघात संजय राऊतांनी केला.

एकनाथ शिंदे यांना भारतरत्न द्या, परमवीर चक्र द्या.. आमचा अक्षय शिंदे पुरस्काराला: संजय राऊत

‘एकनाथ शिंदे यांना भारतरत्न द्यावा. परमवीर चक्र द्यावं. माझा आक्षेप एवढाच आहे महादजी शिंदे शूर योद्धा होता. त्यांना दिल्लीचे पाय कधीच चाटले नाहीत. त्यांच्या नावाचा पुरस्कार एक खाजगी संस्था देते. आणि त्याचा एवढा गवगवा. एकनाथ शिंदेंना पुरस्कार देऊन हा शौर्याचा अपमान. शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाणं महाराष्ट्राला रुचलेलं नाही. त्यांच्या पक्षालाही तर रुचलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र भूषण द्यावा माझा त्याला विरोध नाही.’ असे ते म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!