अमरावतीसह विदर्भभर दहशत माजवणारा गुन्हेगार गजाआड!

रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी चोरी, दरोडे, खून, घरफोडी, मारामारी यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वांछित असलेल्या एका मोस्ट वाँटेड गुन्हेगाराला लोहमार्ग पोलिसांनी अखेर अटक केली आहे! तब्बल 40 गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगाराने संपूर्ण अमरावती, अकोला, भुसावळ आणि बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात धुमाकूळ घातला होता! अखेर पोलिसांच्या सापळ्यात हा धोकादायक आरोपी सापडला आहे! हा गुन्हेगार नेमका कोण आहे? आणि पोलिसांनी त्याला कसा पकडलं? पाहुया हा धक्कादायक अहवाल!
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दहशत माजवणारा नरेश समाधान भांगे (वय 44, रा. अनकवाडी, आष्टी भातकुली, अमरावती) हा अट्टल गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी चोरी, खून, दरोडे, घरफोडी आणि मारामारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती.
शेगाव रेल्वे स्थानक येथे दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होता, पोलिसांना मिळाली होती गुप्त माहिती!
अमरावती जिल्ह्यासह भुसावळ, अकोला, बडनेरा येथे तब्बल 40 गुन्हे दाखल!
बडनेरा लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक करून शेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले!
वलगाव (अमरावती) येथे पोलिसांनी रचला सापळा आणि गुन्हेगाराला घेतले गजाआड!
आरोपीच्या अटकेने रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे! सतत वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे प्रवासी त्रस्त झाले होते. अखेर पोलिसांनी या गुन्हेगाराला पकडून एक मोठी कारवाई केली आहे.
ही कारवाई नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या आदेशाने पार पडली. तसेच उपविभागीय अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, बडनेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्ग नागपूर, बडनेरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सागर खंडारे, निलेश अघम तसेच अमरावती रेल्वे पोलिसांचे राजेंद्र गवई, शरद जूनघरे यांनी सहभाग घेतला.