धक्कादायक गुन्हा! अमरावतीत अवैध जिलेटिन स्फोटकांची तस्करी उघड – पोलिसांची मोठी कारवाई!

अमरावती :- शहराच्या हद्दीत विनापरवाना स्फोटके वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!
अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मोठी कारवाई करत 4 लाख 12 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जुन्या बायपासवरील बगिया टी पॉईंट ते फिरंगी हॉटेलसमोर सापळा रचला आणि एका ट्रॅक्टरला अडवले. तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिलेटिन कांड्या, डेटोनेटर आणि ब्लास्टिंग केबल आढळून आल्या. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. ही जिलेटिन कांड्या नक्की कुठे नेण्यात येत होत्या? त्याचा वापर कोणत्या उद्देशाने होणार होता? याचा शोध सुरू आहे. पाहुयात हा विशेष अहवाल!
अमरावती पोलिसांनी अवैध स्फोटक वाहतुकीचा मोठा कट उघड केला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यातील मधापुरी येथे राहणारा 29 वर्षीय चालक राहुल गजानन पुरी हा एमएच 30 एझेड 1205 क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना जिलेटिन कांड्या वाहतूक करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडला. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बगिया टी पॉईंटजवळ सापळा रचला आणि संशयित ट्रॅक्टर अडवले.
तपासणीदरम्यान 63 नग सोलर सुपर पावर जिलेटिन कांड्या, डेटोनेटर, ब्लास्टिंग केबल, बॅटरी आणि 4 लाख किमतीचा ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केला. आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, ट्रॅक्टर अकोला जिल्ह्यातील ग्राम कवठा सोपीनाथ येथील रामभाऊ काळे यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे. यानंतर बडनेरा पोलीस ठाण्यात कलम 9 ब सह कलम 5, 6, 288, 3, सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही मोठी कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आणि पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली.
आता मोठा प्रश्न असा आहे की, हे स्फोटक नक्की कुठे आणि कोणत्या उद्देशाने नेले जात होते? कोणत्या मोठ्या कटाचा हा भाग आहे? पोलिसांनी यात आणखी कोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे, हे शोधणे गरजेचे आहे!
“अमरावतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके वाहतूक केली जात असताना प्रशासनाला याची माहिती नव्हती का? कोणत्या मोठ्या स्फोटक कटाचा हा भाग आहे? यामागे अजून कोणत्या मोठ्या मास्टरमाइंडचा हात आहे का? हे प्रश्न गंभीर आहेत! पोलिसांनी वेळेत कारवाई केली नसती, तर या स्फोटकांचा वापर कोणत्या विध्वंसक कृत्यात झाला असता?
जनतेनेही सतर्क राहणे गरजेचे आहे! जर कुठेही संशयास्पद हालचाली दिसल्या, तर त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. आता पाहायचं एवढंच की, या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात आणि पुढील कारवाई कशी होते.