LIVE STREAM

AmravatiLatest News

विद्यापीठात संत सेवालाल महाराज जयंती साजरी

अमरावती :- विज्ञानवादी, सत्य व अहिंसा याची शिकवणूक देणारे बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात साजरी करण्यात आली.  यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले.  जयंती कार्यक्रमाला न.न.सा. मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, उपअभियंता (विद्युत) श्री राजेश एडले तसेच विद्यापीठातील कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.  संचालन व संत सेवालाल यांच्याबद्दल माहिती उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!