अमरावती-दर्यापूर महामार्गावर अपघाताचा धोका!

अमरावती :- अमरावती-दर्यापूर राज्य महामार्गावर नूतनीकरणाचे काम सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभाग व वेल्सपन रोड इंन्फाएक्सटी इन्फा यांच्या वतीने हे काम चालू आहे. मात्र, कामाच्या पद्धतीमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वनवे आणि टू वे एकाच मार्गावर असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. बॅरिगेटिंगमुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या समस्येवर प्रशासन काय उपाययोजना करणार? पाहूया आमचा विशेष अहवाल.
अमरावती-दर्यापूर राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग व वेल्सपन रोड इंन्फाएक्सटी इन्फा यांच्या वतीने नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या कामामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
याच दरम्यान, वनवे आणि टू-वे वाहतूक एकाच मार्गावर वळवण्यात आल्याने वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला बॅरिगेटिंग केल्याने वाहतुकीचा संपूर्ण भार एका मार्गावर आला आहे. रात्रीच्या वेळेस दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी अडचण येत आहे.
वाहनधारकांनी प्रशासनाकडे त्वरित उपाययोजनांची मागणी केली असून, सुरक्षा उपाय न केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. महामार्गावरील प्रवासी आणि वाहनचालक यांचे म्हणणे काय आहे? पाहूया.
अमरावती-दर्यापूर महामार्गावर सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वनवे आणि टू-वे एका मार्गावर आल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या नाहीत, तर नागरिक आणि वाहनचालकांचा रोष प्रशासनावर ओढवू शकतो.