कामावरून काढल्याचा राग अनावर, दुचाकी पेटवली आणि जीव दिला, नागपूर हादरलं

नागपूर :- मद्यपान करणाऱ्या कर्मचार्याला कामावरून काढले म्हणून डोजर चालकाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. कामावरून काढून टाकल्यामुळे कर्मचार्याने आधी रागाच्या भरात दुचाकी पेटवली. नंतर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे घडली आहे.
कामावर सतत मद्यपान करून येतो म्हणून सुपरवायझर डोजर मालकाने व्यसनी चालकाला कामावरून काढले होते. ललित वस्त्राने असं डोजर चालकाचे नाव आहे. ललित हा विद्युत केंद्रात डोजर चालक म्हणून कार्यरत होता. ललितला दारूचे प्रचंड व्यसन होते.
ललित नेहमी कामावर दारू पिऊन जायचा. कधी कधी कामाच्या ठिकाणीही तो मद्यपान करायचा. अनेकदा सुपरवायझर तसेच डोजर मालकाने त्याला दारू पिऊन येऊ नकोस असे ठणकावून सांगितले होते. मात्र ललित वस्त्राने याच्या वागणुकीत कुठलीही सुधारणा झालेली नाही.
वारंवार मद्यपान करून येणार्या ललितला सुपरवायझर तसेच डोजर मालकाकडून चेतावणी देण्यात आली होती. मात्र तरीही ललित कायम मद्यपान करून येत होता. याच कारणावरून सुपरवायझर तसेच डोजर मालकाने ललितला कामावरून काढण्याचे ठरवले.
सुपरवायझर तसेच डोजर मालकाने ललितला कामावरून काढले. कामावरून काढल्यानंतर ललितला राग अनावर झाला. खापरखेडा परिसरातील निर्जन स्थळी जात ललितने आधी दुचाकी पेटवून घेतली, नंतर स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.