Accident NewsLatest NewsNagpur
नागपूर पुन्हा हादरले! दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, दोघांचा मृत्यू

नागपूर :- नागपूरमध्ये दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील डोरलीगावाजवळ असलेल्या एका दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही कामगार कंपनीत काम करत होते तर काही कामगार बाहेर होते त्याचवेळी हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नागपूरमध्ये दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीत दुपारी दोनच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटाने आजूबाजूचा परिसर हादरला. लांबपर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आला. या स्फोटामध्ये कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती समोर आली नाही.