Maharashtra Politics
पुण्यात अचानक शेकडो काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

आंदोलकांची गर्दी पाहता वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने संबंधित परिसरात रस्त्यावर बॅरिकेट्स लावले. त्यानंतर आंदोलकांची धरपकड करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलक पुणे डेक्कनच्या दिशेला जात असताना बालगंधर्व चौकात पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. यावेळी आंदोलक पोलिसांचं न ऐकता पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.