मुलाची निर्घृणपणे हत्या, जन्मदात्या आईचं भयंकर कृत्य; पोलीस तपासात धक्कादायक कारण उघड

आंध्रप्रदेश :- आंध्रप्रदेशातून एा थरारक घटना समोर आली आहे. आईने स्वत:च्या मुलाची निर्घृणपणे हत्या केली आहे. मुलाने नातेवाईकांशी केलेले गैरवर्तन असह्य झाल्याने तिने त्याला संपवले आहे. एवढेच नाहीतर तिने तिच्या त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करुन ते कालव्यात फेकले आहेत.
प्रकासमचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, महिला तिच्या मुलाच्या विकृत आणि गैरवर्तणुकीमुळे निराश झाली होती. त्यामुळे तिने थेट त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. के. लक्ष्मीदेवींनी १३ फेब्रुवारीली आपला ३५ वर्षीय मुलगा के. श्यामप्रसाद याला निर्घृणपणे संपवले. ज्यामध्ये नातेवाईकानेही तिला मदत केल्याचा ठपका आहे.
पोलिसांनी पुढे सांगितले की, प्रसादने बंगळुरु, खम्मम आणि हैदराबादमधील त्याच्या काकू आणि इतर नातेवाईकांशी असभ्य वर्तन केले होते. तर त्याने हैदराबाद आणि नरसरोपेत आपल्या मावशींवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांना असा संशय आहे की, कुऱ्हाडी किंवा अन्य धारदार शस्त्राने ही हत्या करण्यात आली आहे. तर हत्येनंतर त्याचा मृतदेह पाच तुकड्यांमध्ये कापून तीन पोत्यांमध्ये भरण्यात आला आणि नंतर कुंबम गावातील नाकालागंडी कालव्यामध्ये टाकण्यात आला. आरोपी महिलेवर बीएनएस कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ती सध्या फरार आहे. पोलिसांनी तिचा शोध सुरु केला आहे.
अलीकडे अनेक थरारक घटना समोर येत आहेत. चार दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. संपत्तीच्या वादातून भावाने बहीण आणि भाचीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सर्वजण घरात असताना हर्षवर्धन याने घरात घुसून बहीण आणि भाचीवर गोळीबार केला. ज्यामध्ये दोघींचाही भयानक अंत झाला आहे.