कृषी महोत्सवातच शेतकऱ्याचा संताप! सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका!

अमरावती :- अमरावतीच्या कृषी महोत्सवात एका शेतकऱ्याचा संतप्त आवाज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे! सरकारच्या आयात-निर्यात धोरणांपासून ते हमीभाव आणि पीक विमा योजनांपर्यंत अनेक मुद्द्यांवर या शेतकऱ्याने सरकारवर हल्लाबोल केला आहे! कोण आहे हा शेतकरी? काय आहे त्याचा रोष? पाहुया आमचा स्पेशल रिपोर्ट
अमरावतीच्या सायन्स्कोर मैदानावर सुरू असलेल्या पाच दिवसीय कृषी महोत्सवात दररोज हजारो शेतकरी उपस्थित राहत आहेत. मात्र, या महोत्सवात एका शेतकऱ्याने व्यक्त केलेला संताप आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे!”
“या शेतकऱ्याचा संताप सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आहे!
शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी संघर्ष का करावा लागतो?
शेतीमालाला योग्य हमीभाव का मिळत नाही?
सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान का होत आहे?
पीक विमा योजनेबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावर संताप!
या सगळ्या मुद्द्यांवर या शेतकऱ्याने महोत्सवात उभं राहून स्पष्ट भूमिका घेतली आणि सरकारवर घणाघाती टीका केली! यामुळेच सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे!
हा शेतकरी अमरावती जिल्ह्यातील असल्याचं समजत असलं, तरी त्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, त्याने बोललेले मुद्दे हे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनातील खदखद मांडणारे आहेत!
विशेष म्हणजे, या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असून अनेक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते या शेतकऱ्याच्या समर्थनार्थ उभे राहत आहेत. सरकारला आता तरी जाग येणार का? शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जाणार का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे!
तर पाहिलंत ना, कसं एका शेतकऱ्याच्या बोलण्याने संपूर्ण अमरावती आणि महाराष्ट्रभर खळबळ माजली आहे! शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे हक्क आणि सरकारचे धोरण यावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटद्वारे कळवा! आणि शेतीशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा