LIVE STREAM

Accident NewsIndia NewsLatest News

दिल्लीकर साखरझोपेत असतानाच मोठा भूकंप! लोक घाबरुन घराबाहेर पळाले

दिल्ली :- देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता 4 इतकी नोंदवण्यात आली आहे. पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी हा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किलोमीटर आतमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. साखर झोपेत असलेल्या दिल्लीकरांची यामुळे भांबेरी उडली. अनेकांनी धराबाहेर धाव घेतली. पाहटेच दिल्लीतील अनेक भागांमध्ये लोक घाबरुन घराबाहेर, इमारतींखाली रस्त्यावर उभे असल्याचं चित्र पहायला मिळालं. भूकंपाचे केंद्रबिंदू दिल्लीजवळच होते.

अनेकजण घाबरुन घराबाहेर पळाले

अगदी काही सेकंदांसाठी आलेल्या हा भूकंप रहिवाशी भागातील नागरिकांना चांगलाच जाणवला. अनेकजण घाबरुन घराबाहेर पळाले. सोशल मीडियावर भूकंप झाला तेव्हाचे अनेक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत.

काहीतरी कोसळल्यासारखं वाटलं

नवी दिल्ली रेल्वे स्थानकामध्ये ट्रेनची वाट पाहणाऱ्या प्रवाशांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार,”मी वेटींग रुममध्ये ट्रेनची वाट पाहत बसलो होतो. अचानक सगळे लोक बाहेर धावू लागले. असं वाटत होतं एखादा पूल वगैरे कोसळलाय की काय.

वेगाने ट्रेन आल्यासारखं वाटलं

अन्य एका प्रवाशाने, “भूकंप अगदी काही सेकंदांसाठी झाला मात्र त्याची तीव्रता अधिक होती. स्टेशनवर एखादी ट्रेन अत्यंत वेगाने आल्यासारखं वाटलं,” असं म्हटलं आहे.

दिल्ली-एनसीआर झोन फोरमध्ये

भूकंपप्रवण क्षेत्राचा विचार केल्यास दिल्ली-एनसीआर सेमिएटीक झोन फोरमध्ये येतं. म्हणजेच या ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरुपाचे झटके बसण्याची शक्यता असते.

प्राथमिक माहितीनुसार या भूकंपामध्ये कोणतीही मोठी वित्तहानी झालेली नाही. तसेच या अपघातात कोणतीही जिवीतहानी अथवा कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!