धारणीमध्ये गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याचा भक्तिमय माहोल

धारणी :- गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त धारणीमध्ये भक्तिरसाची अनोखी पर्वणी सुरू आहे! धारणीतील सुप्रसिद्ध गजानन महाराज मंदिरात १३ तारखेपासून परायण सोहळा सुरू झाला असून, महिलांनी भावपूर्ण वाचन, भजन-कीर्तन, आणि पारंपरिक नृत्याच्या माध्यमातून भक्तिरंग भरवले आहेत. २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी संपूर्ण धारणी भक्तिमय रंगात न्हाऊन निघाली आहे!
धारणी तालुक्यातील सुप्रसिद्ध गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. १३ फेब्रुवारीपासून महिलांनी पारायण वाचनाला सुरुवात केली असून, संत वाङ्मयाचा अभ्यास, भजन, कीर्तन आणि पारंपरिक नृत्यांचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मंडळाच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघत आहे. गजानन महाराज प्रकट दिन हा लाखो भक्तांसाठी श्रद्धेचा दिवस आहे. धारणीच्या हरीहर नगर, फॉरेस्ट नाका येथे वसलेल्या या मंदिरात दरवर्षी भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात येते, ज्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. २० फेब्रुवारी रोजी प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने पारायण पूर्णाहुती, पाऊली सोहळा, महाप्रसाद आणि भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तिरसात न्हालेल्या या सोहळ्यात महिला मंडळ, स्थानिक भाविक आणि कीर्तनकारांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग नोंदवला आहे.धारणीच्या गजानन महाराज मंदिरात सध्या ‘गण गण गणात बोते’चा जयघोष होत असून, संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात गुंग झाले आहे!
धारणीमध्ये गजानन महाराज प्रकट दिनाचा सोहळा दिवसेंदिवस अधिक भक्तिमय होत आहे! महिलांनी घेतलेला पुढाकार, भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तीच्या आनंदात न्हाऊन निघत आहे. २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे!
तुम्हीही या भक्तिरसाचा आनंद घ्या, गजानन महाराजांच्या कृपेस पात्र व्हा! अधिक अपडेट्स साठी पाहत राहा सिटी न्यूज