नागपुरात वाहनचोरी प्रकरण उघड!

नागपुर :- नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती.मात्र, पोलिसांच्या तपासाने वाहन चोरट्यांचा पर्दाफाश झाला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली वाहने जप्त करण्यात आली असून,तब्बल १५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयित आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी वाहने विकल्याचे उघड झाले आहे. चला, पाहुया संपूर्ण अहवाल!”
नागपूर शहरात वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, कोतवाली पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करून मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शिवाजी नगर परिसरातून शिवम नाकाडे आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी शहरात विविध ठिकाणी वाहन चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी १५ दुचाकी जप्त केल्या असून, त्यांची एकूण किंमत सुमारे ७ लाख ८० हजार रुपये आहे.
या तपासात पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदारांचा मोठा सहभाग होता. आरोपींनी चोरी केलेली काही वाहने विकल्याचे उघड झाले असून, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरीच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.
नागपूर पोलिसांनी वाहन चोरांच्या मुसक्या आवळत मोठी कामगिरी केली आहे. नागरिकांनीही त्यांच्या वाहनांची सुरक्षितता राखावी आणि संशयास्पद हालचाली पोलिसांना कळवाव्यात. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा