LIVE STREAM

Accident NewsLatest NewsNagpur

नागपूरच्या कळमेश्वरमध्ये फटाका कंपनीत भीषण स्फोट

नागपूर :- नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील एशियन फायर वर्क्स कंपनीत रात्री दीड वाजता भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये २ मजुरांचा मृत्यू झाला आणि ३ जण गंभीर जखमी झाले आहेत!या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
यावर अधिक माहिती घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये!

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात एशियन फायर वर्क्स या फटाका कंपनीतील बंद असलेल्या मिल युनिटमध्ये मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला.यावेळी कंपनीत ३१ कर्मचारी कार्यरत होते, तर स्फोटाच्या ठिकाणी ७ ते ८ जण उपस्थित होते. स्फोट इतका जोरदार होता की, त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला, आणि कारखान्याच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले.

या स्फोटामध्ये २ मजुरांचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सदर कंपनीत फटाक्यांना आग लावणाऱ्या सुतळी तयार करण्याचे काम सुरू होते, आणि त्याच भागात हा स्फोट झाला.स्फोटाचे अद्याप निश्चित कारण समजू शकले नसले तरी, प्राथमिक तपासानुसार रासायनिक प्रतिक्रियेमुळे हा स्फोट झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

यासंदर्भात स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला असून, स्फोटाच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.फटाका कारखान्यांमध्ये यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत, आणि यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे, तर जखमींवर नागपूरच्या रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.स्थानिक प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून, लवकरच अहवाल सादर केला जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!