महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर

महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट वाढत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत! अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या या घुसखोरांमुळे राज्याची सुरक्षा धोक्यात आली आहे, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. हिंदू जनजागृती समितीसह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवण्याची मागणी केली असून, यांना आश्रय देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तर, यावर अधिक माहिती घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये!
महाराष्ट्रात अवैध बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. सिल्लोड (संभाजीनगर) आणि अंजनगाव (सुरजी) येथे जन्म प्रमाणपत्रांच्या गैरव्यवहारामुळे तब्बल १ लाखांहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बनावट भारतीय कागदपत्रे मिळाल्याचे समोर आले आहे.
या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आणि इतर शासकीय सुविधा मिळवत हे घुसखोर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करत आहेत.
हा प्रकार देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारा आहे आणि म्हणूनच हिंदू जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ त्वरित राबवावी, अशी मागणी केली आहे.या प्रकरणावर हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत. याविषयी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी श्री. गजानन जवंजाळ, श्री. ऋषिकेश ठेलकर (श्रीराम सेना), सौ. वृंदा मुक्तेवार (शिवसेना शिंदे गट), श्री. अभिषेक दीक्षित (श्री शिवप्रतिष्ठान) आणि हिंदू जनजागृती समितीचे सचिन वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.घुसखोरांना मदत करणाऱ्या एजंटांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा वाढता धोका आणि त्याला मिळणारे स्थानिक पातळीवरील समर्थन, हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर विषय बनला आहे.
यावर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन कशा प्रकारे कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक माहितीसाठी आमच्यासोबत राहा!