शिक्षक अधिवेशनात शिक्षण क्षेत्राच्या प्रश्नांवर मंथन!

अमरावती :- अमरावतीत राज्य शिक्षक संघाच्या जिल्हा व महानगर अधिवेशनाला हजारो शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे! नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षकांच्या मागण्या आणि संघटनात्मक लढ्याबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत! पाहुया या अधिवेशनातील ठळक मुद्दे आमच्या खास रिपोर्टमध्ये!
अमरावतीच्या अभियंता भवन येथे पार पडलेल्या राज्य शिक्षक संघाच्या अधिवेशनात शिक्षकांच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. संघटनेच्या माध्यमातून शासनावर दडपण वाढवण्याची गरज आहे, असे मुख्य मार्गदर्शक संजय खोडके यांनी स्पष्ट केले. राज्याध्यक्ष दिलीप कडू यांनी जुनी पेन्शन योजना लवकरच लागू होईल असा विश्वास व्यक्त केला. आमदार सौ. सुलभा खोडके यांनी शिक्षक चळवळीला बळ देण्याचे आश्वासन दिले, तर माजी आमदार वसंतराव खोटरे यांनी शिक्षक आमदार निवडण्याचे आवाहन केले. शिक्षकांच्या न्याय आणि हक्कांसाठी संघटना मजबूत करणे हाच अधिवेशनाचा मुख्य उद्देश ठरला!
शिक्षकांच्या समस्या आणि संघटनात्मक लढा अधिक तीव्र करण्याची गरज अधिवेशनात स्पष्ट झाली आहे. शिक्षक चळवळीला बळ देण्यासाठी तुम्हाला काय वाटतं? कमेंटद्वारे तुमचे मत आम्हाला नक्की कळवा! अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा citynews.