नागपूरमध्ये बनावट दागिने ठेवून बँकेला ७३ लाखांचा गंडा, १७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर :- नागपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये आरोपींनी शिक्षक सहकारी बँकेच्या कमाल चौक शाखेत बनावट दागिने गहाण ठेवून बँकेला ७३ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. हे प्रकरण पाचपावली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे, आणि यामध्ये एकूण १७ आरोपींचा समावेश आहे. आरोपी अनिल उरकुडे आणि त्याच्या सहकार्यांनी बनावट दागिने खरे असल्याचे सांगून बँकेकडून गोल्ड लोन घेतले. बँकेच्या व्यवस्थापक लक्ष्मण विठ्ठलराव सिंगम यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चला तर, जाणून घेऊया या प्रकरणाची संपूर्ण माहिती.
या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आरोपींच्या अटकेची प्रक्रिया पुढे सुरू आहे. बँकेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं असून, याप्रकरणात अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. लवकरच या प्रकरणातील नवीन अपडेट्स ची माहिती घेऊ बघत रहा सिटी न्यूज.