बांगलादेशी रोहिंग्या प्रकरण

अमरावती :- अमरावतीत मोठा घोटाळा! बनावट कागदपत्रं तयार करून बांगलादेशी रोहिंग्यांना जात प्रमाणपत्रं मिळवून दिली जात आहेत. किरीट सोमय्या यांनी घेतली ग्रामीण पोलिस अधीक्षकांची भेट, घोटाळ्याचा पर्दाफाश. बघूया काय आहे हे प्रकरण.
अमरावती जिल्ह्यात बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचं गंभीर प्रकरण उघडकीस आलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अमरावतीत गाडगेनगर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून, याआधी अंजनगाव सुर्जी येथे आठ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. एकूण आरोपींची संख्या 14 वर गेली आहे.
किरीट सोमय्या यांनी सांगितलं की, “बांगलादेशी रोहिंग्यांची व्याप्ती वाढत चालली आहे. अमरावती शहरात 5000 लोक बेकायदेशीररित्या राहत आहेत. त्यांनी 50-70 वर्षे जुने पुरावे दिले, पण आतापर्यंत हे लोक कुठे होते? जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई होईल!