भाजपची सदस्यता मोहीम ६०% पूर्ण – मंत्री अशोक उईके

यवतमाळ :- भाजपच्या सदस्यता मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत असून राज्यभर मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आहेत. आदिवासी मंत्री व भाजप जिल्हा संपर्क मंत्री प्रा. अशोक उईके यांनी पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली
राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने आपली सदस्यता मोहीम गतिमान केली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत राज्यात १ कोटी नागरिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून देशभर हे संख्याशास्त्र १.५० कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
यवतमाळ जिल्ह्यासाठी २ लाख ८० हजार सदस्यांची भरती करण्याचे लक्ष्य असून आतापर्यंत यवतमाळ तहसीलमधून ३०८००, वणी तहसीलमधून ३१७८८, आर्णी तहसीलमधून ३१७९२ आणि राळेगाव तहसीलमधून ४०१८२ सदस्य नोंदवले गेले आहेत.
भाजपचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकारने आदिवासी आश्रमशाळांमधील समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांना त्या ठिकाणी एक रात्र राहण्याचा उपक्रम राबवण्यास सांगितले आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महायुती सरकार लक्ष केंद्रित करत असून योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
भाजपच्या सदस्यता मोहिमेने जोर पकडला असून १९ फेब्रुवारीपर्यंत १००% उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेला माजी खासदार हंसराज अहिर, राजाभाऊ ठाकरे, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.