मालमत्ता जप्ती अन् मालमत्ता करासाठी मोहीम उत्पन्न वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न
अमरावती :- मनपा प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी जोरदार मोहीम उघडली आहे. यानुसार मालमत्ता जप्तीची कारवाई आणि मालमत्ता करासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. पाचही झोननिहाय मालमत्ता कर जप्ती मोहीम अंतर्गत प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
थकीत असलेल्या थकबाकीदारांवर मालमत्ता कर वसूल करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा व नोटीस देऊनसुध्दा थकबाकीदार हे थकीत भरत नसल्याने झोन क्र.१ ते ५ चे सहायक आयुक्त यांनी वॉरन्ट बजावले. त्यानंतर मालमत्ता जप्तीचे आदेश दिले. त्यामुळे नागरिकांना मालमत्ता कर ‘भरण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबवले होते. यात जनजागृती, जप्ती मोहीम, नोटीस अशा विविध उपाययोजनांबरोबर पोस्टाद्वारे तसेच ज्या मालमत्ता करधारकांचे रजिस्ट्रेशन असलेल्या करदात्यांना ईमेल, मोबाईलवरती संदेश पाठवून देयक पाठवण्यात आले आहेत. तसेच थेट वसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा देण्यासाठी प्रभागांमध्ये वसुली पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच नागरिकांना मालमत्ताकरांबाबत काही अडचणी असल्यास महानगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले होते.
आज दिनांक १८/०२/२०२५ रोजी पाचही झोन अंतर्गत थकीत मालमत्ता धारकांवर मालमत्ते वर जप्ती संदर्भात कार्यवाही केले असून उत्तर झोन क्र.१ रामपुरी कॅंम्प मधील मालमत्ता कर वसुल रु.२४.७० लाख, मध्य झोन क्र.२ राजापेठ मधील मालमत्ता कर वसुल रु.२१.६३ लाख, पुर्व झोन क्र.३ दस्तुरनगर मधील मालमत्ता कर वसुल रु.५५.६० लाख, दक्षिण झोन क्र.४ बडनेरा मधील मालमत्ता कर वसुल रु.९.६० लाख, पश्चिम झोन क्र.५ भाजीबाजार मधील मालमत्ता कर वसुल रु.१२.६९ लाख असे एकुण १.२४ कोटी मालमत्ता कर वसुल करण्यात आले.