मेळघाटात तिसऱ्या बर्ड काऊंट कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

मेळघाट :- आपल्याला अमरावतीतून एक महत्त्वाची बातमी समोर आणत आहोत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात तिसऱ्या बर्ड काऊंट कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले आहे. १३ ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान गुगामल आणि सिपना वन्यजीव विभागात पार पडलेल्या या बर्ड सर्व्हे कार्यक्रमात देशभरातील ४८ पक्षी अभ्यासक सहभागी झाले.
तिसऱ्या बर्ड काऊंट कार्यक्रमाचे उद्घाटन १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सेमाडोह येथे पार पडले. या कार्यक्रमात ४८ पक्षी अभ्यासकांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात आदी राज्यांतून सहभाग घेतला. त्यानंतर, सर्व पक्षी अभ्यासक मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल, सिपना व मेळघाट वन्यजीव विभागातील २५ कॅम्पवर पक्षी निरीक्षणासाठी रवाना झाले.
चार दिवसांच्या या सर्व्हे मध्ये पक्षी प्रजातींची नोंदणी करून त्याची माहिती संकलित करण्यात आली. १६ फेब्रुवारी रोजी सेमाडोह येथे या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय वनाधिकारी श्री मनोजकुमार खैरनार उपस्थित होते. यावेळी, मानद वन्यजीव रक्षक आणि पक्षी अभ्यासक डॉ. जयंत वडतकर यांनी पक्षी जैवविविधतेवर विचार मांडले आणि सर्व शास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रासंचालक आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. जयंत वडतकर, प्रा. डॉ. चेतना उगले, किरण मोरे आणि मनिष ढाकुलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.”तिसऱ्या बर्ड काऊंट कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व आयोजकांना आणि सहभागी पक्षी अभ्यासकांना मनापासून धन्यवाद. ही एक महत्त्वाची कार्यवाही होती, जी पक्षी संरक्षणासाठी आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरली.
यावर्षीच्या बर्ड काऊंट कार्यक्रमात पक्षी निरीक्षणाच्या क्षेत्रातील अनेक अनुभव शेअर करण्यात आले आणि मेळघाटची जैवविविधता आणखी समृद्ध असल्याचा ठसा सर्व उपस्थितांवर पडलं. या यशस्वी आयोजनामुळे वन्यजीव संरक्षणासाठीचे महत्त्व लक्षात आणले गेले. अधिक तपशील आणि पुढील कार्यवाहीबाबत आम्ही लवकरच आपल्याला कळवू.