यशोधरानगर पोलीस ठाणे: ट्रक धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागपूर :- नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमणा रिंग रोडवर झालेल्या अपघातामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १७ फेब्रुवारी च्या दुपारी फिर्यादी शारदाप्रसाद मिश्रा यांच्या ३० वर्षीय मुलाचे वाहन, मोपेड मेस्ट्रो, कळमणा रिंग रोडवरून जात असताना, एक ट्रक भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवत मागून येवून धडकला. ट्रक क्र. के.ए ०६ ए.बी २९४७ चा चालक अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहन चालवत होता. या धडकेत फिर्यादीच्या मुलाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला त्वरित मेयो हॉस्पिटलमध्ये नेले गेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलीसांनी फिर्यादी शारदाप्रसाद मिश्रा यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) आणि १८४ मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
आत्तापर्यंत मिळालेल्या माहिती नुसार, यशोधरानगर पोलीस ठाण्याने अपघातातील आरोपीविरुद्ध गंभीर कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात पुढील तपासांची माहिती आपल्याला लवकरच देऊ. तोपर्यंत वाहन चालवताना सतर्क रहा आणि पूढील अपडेट साठी बघत रहा सिटी न्यूज