श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव 2025: गजानन धाम साईनगर, अमरावती येथे श्री शिव महापुराण ज्ञान यज्ञ आणि भव्य सोहळ्याचे आयोजन

अमरावती :- श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव 2025 चे आयोजन अमरावती येथील गजानन धाम साईनगरमध्ये सुरू झाले आहे. श्री शिव महापुराण ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे भक्तवृंदांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
प्रगट दिन महोत्सवाच्या प्रारंभासह गजानन धाम साईनगरमध्ये श्री शिव महापुराण ज्ञान यज्ञ सप्ताह सुरू झाला आहे. या यज्ञ सप्ताहात कथा प्रवक्ते परम श्रद्धेय श्री पंकज कृष्ण शास्त्री श्रीधाम वृंदावन यांच्या मधुर वाणीतून महाशिवपुराणाची कथा सांगितली जात आहे. यावेळी परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.महोत्सवाच्या 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत पालखी सोहळा आणि भव्य दिंडी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित आहे. तसेच, 20 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते पाच या कालावधीत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भक्तांना या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव नाखाले यांनी आवाहन केले आहे.
श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी अथक परिश्रम घेतले आहेत. तसेच या कार्यक्रमामुळे गजानन महाराजांच्या उपास्य देवतेचे महत्त्व पुन्हा एकदा उजागर होणार आहे. सर्व भक्तांना महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.