आयटीआयच्या विभागीय तंत्रप्रदर्शनी 2025 चे सुरेख आयोजन
अमरावती :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता व नावीन्यता विभागा अंतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावतीच्यावतीने 18 फेब्रुवारी रोजी स्थानिक भगिणी निवेदिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची येथे आज विभागीय स्तरावरील तंत्रप्रदर्शनी 2025 चे आयोजन करण्यात आले होते.या तंत्रप्रदर्शनी मध्ये संपूर्ण विभागातून पाच जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनेने विविध कौशल्य वापरून आधुनिक कलाकृती सादर केली होती.या प्रदर्शनीमध्ये अभियांत्रिकी गटातून 37 कलाकृती तर बिगर अभियांत्रिकी गटातून 14 कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या. या तंत्रप्रदर्शनीमध्ये सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या तज्ञ व्यवसाय शिल्पनिदेशकांच्या मार्गदर्शनातून विविध कौशल्ये वापरून नावीन्यपूर्ण कलाकृति सादर केल्या होत्या.
तत्पूर्वी या विभागीय तंत्रप्रदर्शनीचे उदघाट्न विभागाचे सहसंचालक मा. प्रदीप घुले यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी प्रभारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राम मुळे,सदरहू संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेश शेळके,उपसंचालक अनंत सोमकुवर, सहाय्यक संचालक के डी फुटाणे, निरीक्षक सौं.एम. आर गुढे आदी अधिकारी उपस्थित होते.
या तंत्रप्रदर्शनीमध्ये ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या अविष्कारपुर्ण कौशल्याने कलाकृती सादर केल्या त्याचे तज्ञ् परीक्षक समितीच्या माध्यमातून परीक्षण करण्यात आले.त्यामध्ये अभियांत्रिकी गटातून 7 उत्कृष्ट मॉडेल व 3 उत्कृष्ट मॉडेल बिगर अभियांत्रिकी गटातून निवडण्यात आले.त्यामधून प्रथम पुरस्कार पुंडलिक महाराज वरुड आय टी आय च्या विजतंत्री व्यवसायातील “वुमेन सेफ्टी” या मॉडेल ला विजेते म्हणून घोषित करण्यात आला .तर दुसरा क्रमांक देऊळगाव राजा आय टी आय च्या जोडारी व्यवसायातील “ऍग्रीकल्चर इक्विपमेंट “, तिसरा क्रमांक संत तुकडोजी महाराज आय टी आय मोझरी येथील विजतंत्री व्यवसायातील” स्मार्ट होम सिस्टीम”, चौथा क्र बाबाजी दाते आय टी आय यवतमाळ येथील इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या व्यवसायातील “कार पार्किंग सिस्टीम “, पाचवा क्रमांक यवतमाळ आय टी आय च्या मोटर मेकॅनिक या व्यवसायातील “गो कार्ट ” या मॉडेलला, सहावा क्रमांक मोताळा बोरखेडी येथील के बी जे आय टी आय मधील “सोलर टूल”या मॉडेल ला तर सातवा क्रमांक संत जाटूबाबा धारणी या आय टी आय मधील” पोल्युशन कंट्रोल” या अभिनव मॉडेल ला पुरस्कार घोषित करण्यात आला.
बिगर अभियांत्रिकी गटातून प्रथम पुरस्कार संत मुगसाजी महाराज दारव्हा आय टी आय च्या कोपा व्यवसायातील “लीना ए आय टूल “या मॉडेल ला प्राप्त झाला असून दुसरा क्रमांक बुलढाणा आय टी आय च्या फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या व्यवसायातील “एक प्रवेश असाही “या मॉडेलला तर तिसरा क्रमांक रहाटगाव आय टी आय च्या फॅशन डिझाईन या व्यवसायातील “लुप इंट्रीकेट फ्युजन आरी वर्क ” या मॉडेलला प्रदान करण्यात आला.
या तंत्रप्रदर्शनीमधील मॉडेल्स विजेत्यांना विभागाचे सहसंचालक मा. प्रदीप घुले व इतर मान्यवरांचे शुभ हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सुरेख संचालन सुषमा गुडधे मॅडम व रक्षा मुंडे यांनी केले. विभागस्तरीय तंत्रप्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी भातकुली आय टी आय चे प्राचार्य के एस वानखडे, भगिनी निवेदिता आय टी आय मुलींची येथील गटनिदेशक वाय एस घुगे, प्रमोद कोळमकर, शिल्पनिदेशक श्रीकांत जोशी,गुप्ता सर, पडोळे मॅडम,संजय पाटील, बारस्कर, सौं राऊत, भूषण चव्हाण, विशाल बकाले,भारसाकळे मॅडम, गलफट मॅडम, गावंडे मॅडम, कुकडे मॅडम, निळे मॅडम, श्रीखंडे मॅडम, देशमुख मॅडम, धरमकर मॅडम, शेंडे सर, गवई सर, वायधने सर, साबळेसर आदी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.