आ.रवि राणा यांचे युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयात श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
अमरावती :- आज दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी आ.रवि राणा यांचे युवा स्वाभिमान पार्टी मुख्य कार्यालय राजापेठ येथे श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रथमत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. प्रगतीची उत्तुंग स्वप्ने कृतीत उतरविणाऱ्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा यावेळी उपस्थित मावळ्यांनी करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्यात आला. तसेच माँ भवानी, माँ जिजाऊ व हर हर महादेव यांचाही जयघोष यावेळी करण्यात आला.
देव, देश आणि धर्मासाठी लढायला शिकवणाऱ्या आपल्या संस्कृतीचा-भाषेचा अभिमान बाळगायला शिकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासावर आ.रवि राणा यांच्या कार्यालयाचे सचिव श्री.उमेश ढोणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बबीताताई अजबे यांनी श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवन चरित्रावर कविता म्हणून दाखविली. यावेळी युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयाचे सचिव उमेश ढोणे, दिपक जलतारे, आकाश राजगुरे, मनोज ढवळे, मयुर अवझाडे, बबिता अजबे, सुवर्णा शिंदे, ज्ञानेश्वरी लोणे, आस्था काटे, धर्मेश पारीख, प्रयास चऱ्हाटे, संकेत गादे, प्रसाद बिसने, करण कळसाईत, रोहन कळसाईत, सतिश कडु, भावेश पवार, पवन करपती