परतवाड्यात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा!

अमरावती ,परतवाडा :- जय जिजाऊ, जय शिवराय! दरवर्षीप्रमाणे यंदाही परतवाड्यात शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करताना शहरातील शिवभक्तांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. विशेषतः प्रमोद भाऊ ढेरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण परतवाडा भगवेमय झाला.
परतवाड्यातील बालाजी मंदिरापासून निघालेली शिवजयंती शोभायात्रा शिवतीर्थावर उत्साहात पोहोचली. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. भगवे फेटे परिधान केलेले मावळे, ऐतिहासिक झांक्यांचे भव्य दर्शन, आणि उत्साहाने भरलेली गर्दी यामुळे परतवाड्याचा शिवजयंती सोहळा अधिक भव्य स्वरूपात पार पडला. शिवतीर्थावर पोहोचल्यावर शिवपूजन करण्यात आले, तसेच व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले होते. गावंडे परिवाराकडून विशेष स्वागत करण्यात आले
जय भवानी जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणेने जूळे शहर दुमदुमले “शिवजयंतीचा हा ऐतिहासिक उत्सव परतवाड्यातील शिवप्रेमींना पुन्हा एकदा छत्रपतींच्या स्मृतींना उजाळा देणारा ठरला