महाराष्ट्र ग्राम दर्पण कार्यालय अमरावती येथे शिवजयंती साजरी
अमरावती :- रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र ग्राम दर्पण कार्यालय अमरावती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध देशमुख यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी चंद्रशेखर देवडे, प्रदीप निचडे, हर्षरत्न पाते, सुमित जनबंधू , सोनाली पुंडकर, सोनाली बदरके, कविता देशमुख, दर्शना पाटील, पूजा जाधव, साक्षी भोंगे, नेहा पंत, शुभांगी राऊत, प्रतीक्षा धसकट, कार्तिक चराटे, ऋषिकेश ढेपे आदींची उपस्थिती होती. यावेळी ऋषिकेश ढेपे यांनी शिवगर्जना करीत शिवरायांना अनोखी मानवंदना दिली. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकच जयघोष केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध देशमुख यांनी शिवरायांना अभिवादन करत असे प्रतिपादन केले कि, छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि कुशल प्रशासक होते. शिवरायांचे हे विचार आणि कार्य समतावादी व न्यायपूर्ण समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आजही दीपस्तंभासारखे मार्गदर्शक स्वरूपाचे आहे. शिवराज्यातील अर्थ व्यवस्था, धर्मनिरपेक्ष धोरण, स्त्री-पुरुष समानता , शेती विकासाचे धोरण महत्वाचे असून प्रजा हित व रयतेचे कल्याण साधण्याकरिता महाराजांच्या काळातील राज्यकारभार हेच खरे सुशासन आहे. अशा प्रकारे शिवाजी महाराजांची एक कुशल प्रशासक म्हणून कीर्ती असल्याने आज शिवाजी महाराज प्रत्येक माणसाच्या हृदयरुपी सिंहासनावर आरूढ आहे. महाराजांनी बुद्धिकौशल्य, युद्ध कला व तंत्र वापरून आजच्या पिढीसमोर एक लढवय्या योद्धा कसा असतो, त्याचा आदर्श निर्माण करून दिला, त्यांची गड किल्यांची रचना ही,म्हणजे आजच्या नवीन पिढीसाठी स्थापत्यकलेचा एक नजराना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुसरण करून सर्वानी सुशासन व स्वराज्याची ज्योत सदैव तेवत ठेवण्यासाठी नवा संकल्प व नवीन जाणीव निर्माण करण्याचे आवाहन सुबोध देशमुख यांनी केले.