शिवजयंतीनिमित्त प्रहार पक्षाच्यावतीने जिजाऊ स्मारकाजवळ लाडू वाटप

अमरावती :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अकोल्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाजवळ प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवरायांच्या मूर्तीचे दुग्धाभिषेक आणि पूजन करण्यात आले. तसेच, पाच हजार लाडू वाटप करून उपस्थित शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
शिवजयंती म्हटली की महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयात अभिमानाची आणि प्रेरणेची जाणीव होते. याच भावनेने प्रेरित होत, प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने अकोल्यातील राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाजवळ शिवजयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाच्या पूजनाने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर जय भवानी जय शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी दणाणून गेला.
या प्रसंगी प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके, वसू महाराज बेलोरा, उपसरपंच अतुल सिंगन, जितू दुधाने, गोलू पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. शिवरायांच्या जयंतीचे औचित्य साधून पाच हजार लाडूंचे वाटप करण्यात आले. शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला आणि शिवरायांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्धार केला. कार्यक्रमादरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांवर मार्गदर्शन केले आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
शिवजयंती हा केवळ सण नाही, तर प्रेरणेचा सोहळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या शिकवणींना स्मरण करून नव्या पिढीला त्या विचारांची जाणीव करून देण्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचा उपक्रम स्तुत्य आहे. भविष्यातही असेच उपक्रम राबवले जावेत, हीच अपेक्षा.