सिव्हील कॉन्ट्रॅक्टरकडून ३३ लाखांची फसवणूक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर :- एक नजर टाकुया नागपूरच्या क्राइम जगतावर, नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत एक सिव्हील कॉन्ट्रॅक्टर असलेल्या फिर्यादीवर आरोपीने विश्वासघात करत ३३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपीने बांधकामाचे काम देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून मोठी रक्कम उचलली आणि काम न करता त्यांना आर्थिक फसवणूक केली. पोलीस तपास सुरू आहे.
नागपूर पोलीस ठाणे पाचपावली हद्दीतील आशीयाना सोसायटी, मातीबाग, नागपूर येथील फिर्यादी स्वप्नील मोरेश्वर जांगडे हे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर असून त्यांची ‘एलीयन इंफावेनर्स’ नावाची फर्म आहे. त्यांच्या ओळखीचे विजय मधुकर मेश्राम, जो ‘महालक्ष्मी इंफ्राटेक’ नावाच्या कंपनीचा संचालक आहे, यांनी फिर्यादीला त्याच्या कंपनीसोबत काम करण्याचे आमिष दाखवले.
आरोपीने सांगितले की, त्याच्या कंपनीला बी.एस.एन.एल.चे १०० टॉवर ऊभारणीचे प्रोजेक्ट मिळाले असून त्यासाठी फिर्यादीला फाउंडेशनचे काम देण्यात येईल. आरोपीने दिल्ली येथील बी.एस.एन.एल कार्यालयात ओळख असल्याचे सांगत २० लाख रुपयांच्या खर्चाची शिफारस केली.
फिर्यादीने आरोपीवर विश्वास ठेवून त्याच्या खात्यात २० लाख रुपये ट्रान्सफर केले आणि बांधकाम व ट्रान्सपोर्टेशनसाठी आणखी १३,९४,४०० रुपये दिले. मात्र, आरोपीने फिर्यादीला कोणतीही कामे न देत त्यांच्याकडून एकूण ३३,९४,४०० रुपये घेतले आणि रक्कम परत मागितल्यावर त्याने टाळाटाळ केली.
या प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीनुसार पाचपावली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
आरोपीच्या या विश्वासघातामुळे फिर्यादीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल अशी अपेक्षा आहे. पुढील माहिती आणि इतर अपडेट्ससाठी बघत रहा सिटी न्यूज .