होटल महाकालीजवळ मलब्याने भरलेला टिप्पर पलटी; मोठा अपघात टळला

अकोला :-अकोला महामार्गालगत असलेल्या होटल महाकाली जवळ मलब्याने भरलेला टिप्पर पलटी झाला. सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरीही या घटनेमुळे निकृष्ट दर्जाच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊया आमच्या खास रिपोर्टमध्ये.
अकोला शहरातील राज्य महामार्गावर मंगळवारी मोठा अपघात झाला. मलब्याने भरलेला टिप्पर अचानक पलटी झाला आणि त्यातील संपूर्ण मलबा रस्त्यावर सांडला. घटनेच्या वेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू होती. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे.
नागरिकांनी या अपघातानंतर संबंधित विभाग आणि ठेकेदारांवर ताशेरे ओढले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, शहरात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. नाले, रस्ते आणि बांधकामे अल्पावधीतच खराब होत आहेत. प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत आहे. या अपघातानंतर नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला असून, अधिकाऱ्यांनी यावर ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
तर पाहिलंत, कशा प्रकारे निष्काळजीपणामुळे मोठा अपघात टळला असला तरी मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. प्रशासन आणि संबंधित विभाग यावर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागरिकांनी वारंवार भ्रष्टाचार आणि हलक्या दर्जाच्या कामांबद्दल आवाज उठवला असला, तरी अजूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.