अमरावतीत ठगबाज पंजवानी अटकेत! लाखोंची फसवणूक उघड!

अमरावती :- अमरावतीत फसवणुकीचा मोठा पर्दाफाश! लाखोंची लूट करणारा अनिल पंजवानी अखेर पोलिसांच्या ताब्यात! सुप्रीम कोर्टाने जामीन याचिका फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली, पण अजूनही 53 लाखांचा एकही पैसा हस्तगत झालेला नाही! पोलिस या प्रकरणात काय खुलासा करणार? आणखी किती जण या फसवणुकीच्या जाळ्यात आहेत? पाहा आमचा विशेष अहवाल!
अमरावतीत व्यापारी वर्गाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे! बिजीलँड येथे असलेल्या गुरुकृपा गारमेंट्स या दुकानाचे व्यवस्थापक अनिल पंवानी याने मालक अमर आहूजा यांची तब्बल ५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आरोपीने थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत मंगळवारी अनिल पंजवानीला अटक केली. कोर्टाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अनिल पंजवानी हा मालकाचा विश्वासू कर्मचारी होता. अमर आहूजा यांनी त्याला दुकान आणि गोदामाचे संपूर्ण व्यवस्थापन सोपवले होते. मात्र या विश्वासाचा गैरफायदा घेत गोदामातील लाखोंचा माल त्याने बाहेरच्या व्यापाऱ्यांना विकला आणि त्यातून ५३ लाख रुपये हडप केले.
या प्रकरणात काही व्यापारी संघटनांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमर आहूजा यांनी हा अन्याय सहन न करता थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत अखेर आरोपीला गजाआड केलं. तपास यंत्रणांना अजूनही फसवणुकीतून गायब झालेला पैसा किंवा माल सापडलेला नाही. पोलिसांनी पंजवानीची कसून चौकशी सुरू केली असून पुढील काही दिवसांत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
तर मित्रांनो, या ठगीच्या जाळ्यात अजून किती रहस्य दडले आहे? पोलिस पंजवानीकडून 53 लाखांची वसूली करू शकतील का? की हा पैसा कायमचा डुबला? आणि सगळ्यात मोठा प्रश्न – या फसवणुकीच्या साम्राज्यात अजून कोण आहेत? पाहा आमची खास कव्हरेज, आम्ही तुमच्यासमोर आणू या घोटाळ्याची सगळी खरी बाजू!