आराध्या फाऊंडेशनच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य महारॅलीचे आयोजन!

अमरावती :- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अमरावती शहरात आराध्या फाऊंडेशनच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य महारॅलीने संपूर्ण शहरात उत्साह संचारला आहे. या रॅलीत शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
अमरावती शहरात शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेली ही भव्य महारॅली संपूर्ण शहराचे आकर्षण ठरली. आराध्या फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात काढलेल्या या रॅलीत हजारो युवकांनी सहभाग घेतला. शेगाव नाका चौकातून निघालेल्या या महारॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार भव्य ट्रेलरवर साकारण्यात आला होता. स्लाईड शोच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा जीवनपट सादर करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, भगवे आणि निळे ध्वज फडकवत युवकांनी जल्लोष केला. यानंतर गाडगेबाबा समाधीस्थळी महाआरतीने या सोहळ्याची सांगता झाली. संपूर्ण अमरावती नगरी शिवमय झाली होती!
शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने अमरावती नगरीत भरघोस उत्साह पाहायला मिळाला. आराध्या फाऊंडेशनच्या या ऐतिहासिक रॅलीने शिवप्रेमींमध्ये नवा जोश निर्माण केला.